पारा घसरला, जिल्हा गारठला, यंदाच्या मोसमात सर्वाधिक कमी तापमान @ 7.0

गोंदिया ◼️जिल्ह्यात आठवड्याभरापासून निसर्गाचा लहरीपणा दिसून येत आहे. परिणामी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी तुरडक पावसाची नोंदही झाली. त्यातच कालपासून वातावरण स्वच्छ झाल्याने तापमानातही घसरण झाली आहे. ७व ८ जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्याचा तापमान ७.० सेल्सीयस वर गेला. विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. थंडीचा जोर अद्यापही कायम असल्याने येत्या काही दिवस थंडीचा लाट असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे या थंडीने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम पडू लागले आहे.

काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात धुक्याची चादर व गारवा वाढल्याचे दिसून आले. त्यातच आज विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली आहे. जिल्ह्याचा पारा ५ जानेवारी १२.५ अंशावर तर ६ जानेवारी रोजी ११.८ तर ७ जानेवारी रोजी ७.० सेल्सीयस वर घसरला. शहरीसह ग्रामीण भागात थंडीचा जोर चांगलाच वाढल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेवू लागले आहे.

जिल्ह्यात निसर्गाचा लहरीपणा हा नित्याचाच झाला आहे. अवकाळी पावसाचाही सामना जिल्ह्यात करावा लागतो. त्यातच बुधवारला सायंकाळी शहरासह काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. ७ जानेवारी रोजी गोंदियाचे तापमान विदर्भात सर्वात कमी ७.० अंश सेल्सियस राहिले आहे. तापमानात घट झाल्याने व सर्वत्र धुक्याची चादर ओढलेली असल्याने गुलाबी थंडीचा आस्वाद शहरवासियांनी मिळाला आहे. दरम्यान पुढील काही दिवस तापमानात घट होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच वाहनचालकांना या दाट धुक्यातून जाताना कसरत करावी लागत आहे. जिल्हावासीयांना हवा मानाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. तर तापमानात घट झाल्याने ग्रामीण भागात शेकोटीचा आधार घेतला जात आहे. त्यातच नागरिकांच्या आरोग्यावरही या थंडीचा प्रभाव जाणवू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share