थंडीच्या लाटेपासून बचावासाठी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

वर्धा : सध्या जिल्ह्यात थंडीची लाट सुरु असुन दैनंदिन तापमानात घट होत आहे. त्यामुळे या लाटेपासुन बचाव करण्याकरीता काय करावे व काय करु नये याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

काय करावे : हिवाळ्यातील पुरेसे कपडे घालावे, कपड्यांचे अनेकस्तर देखील उपयुक्त आहेत. थंडीच्या लाटे दरम्यान शक्य तितके घरातच रहावे, थंड वाऱ्यांचा संपर्क टाळण्यासाठी प्रवास कमी करावा. कपडे कोरडे ठेवावे. ओले असल्यास शरीरातील उष्णता कमी होऊ नये म्हणुन कपडे लवकर बदलावे. हातमोजेपेक्षा मिटन्सला (लोकरीचे मोजे) प्राधान्य द्यावे, मिटन्स थंडीपासुन अधिक उष्णता आणि इन्सुलेशन प्रदान करतात. हवामान अंदाजासाठी रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा, गरम पेय नियमित घ्यावे, पाईप्स गोठू शकतात म्हणुन पुरेसे पाणी वाठवणुक करुन गरम पाणी प्यावे. हिमबाधाच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे जसे की बधीरपणा येणे, अंगावर हातापायांवर, बोटांवर पांढरा किंवा फिकटपणा येणे, फ्रॉस्टबाईटने प्रभावित झालेला भागास गरम पाण्यात घालु नये.

हायपोथर्मियाच्या बाबतीत : व्यक्तीला उबदार ठिकाणी ठेऊन गरम कपडे घालुन दयावे. थंडीपासून संरक्षण करण्याकरीता ब्लॅकेटचे कोरडे थर, कपडे, टॉवेल किंवा चादरी वापरुन व्यक्तीचे शरीर उबदार करावे. शरीराचे तापमान वाढण्यास मदत करण्यासाठी उबदार पेय द्यावे. मद्यपानाचा वापर करु नये. स्थिती बिघडल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.

हे करु नका : मद्यपान सेवन करु नये. यामुळे शरीराचे तापमान कमी होते. हिमबाधा झालेल्या भागाची मालिश करु नये. यामुळे अधिक नुकसान होऊ शकते. शरीराच्या कापण्याकडे दुर्लक्ष करुन नका, शरीरातील उष्णता कमी होत आहे हे एक महत्वाचे लक्षण आहे.

शीत लहरी, जमीनीवरील दव परिस्थितीसाठी काय करावे आणि काय करु नये : थंडीपासुन पिकांचे संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके आणि वारंवार सिंचन, तुषार सिंचन करावे. तरुण फळझाडे सरकंदा, स्ट्रा, पॉलिथिन शीट्स गोनीने झाकून ठेवावी. केळीचे घड सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांसह झाकुन ठेवावी.

धान रोपवाटिकेमध्ये : रोपवाटिकेचे बेड रात्री पॉलिथिनच्या शीटने झाकुन ठेवा आणि सकाळी काढून टाकावीत. रोपवाटिकांना संध्याकाळी पाणी द्यावे आणि सकाळी पाणी काढून टाकावे. मोहरी, राजमा आणि हरभरा यासारख्या संवेदनशील पिकांचे दवापासून संरक्षण करण्यासाठी सल्फ्युरि ऍसिड@0.1 टक्के (1 लिटर H2SO4 1 हजार लिटर पाण्यात) किंवा थायोरिया @500 पीपीएस (1 हजार लिटर पाण्यात500 ग्रॅम थायोरिया ) मिसळून फवारणी करावी. फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरवातीला झाडांच्या प्रभावित भागांची छाटणी करावी, छाटणी केलेल्या झाडांवर तांबे बुरशीनाशकांची फवारणी करावी आणि सिंचनासह एनपीके लावावी. थंडहवामानात मातीत पोषक द्रव्ये लावू नका, मुळांच्या खराब क्रियाकलापांमुळे वनस्पती शोषू शकत नाही. मातीला त्रास देऊ नका, सैल पृष्ठभाग खालच्या पृष्ठभागावरुन उष्णतेचे वहन कमी करते.

पशुसंवर्धनासाठी हे करावे : रात्रीच्या वेळी गुरे शेडमध्ये ठेवा आणि त्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी कोरडे अंथरुन द्या. सर्दीस्थितीचा सामना करण्यासाठी जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी खाद्यामध्ये प्रथिने आणि खनिजांचे प्रमाण वाढवा. जनावरांची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी हिवाळ्याच्या काळात दररोजच्या रेशनमध्ये 10 टक्के ते 20 टक्के दराने मिठासह जनावरांना खनिज मिश्रण आणि गव्हाचे धान्य, गुळ इत्यादी द्या. पोल्ट्रीमध्ये, पोल्ट्री शेडमध्ये कृत्रिम प्रकाश देऊन पिलांना उबदार ठेवावा. सकाळच्या वेळी गुरे, मेंढ्यांना चरायला नेऊ नका, रात्रीच्या वेळी गुरे व शेळ्या उघडयावर ठेऊ नका. याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share