महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस ठाणे चिचगड अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

देवरी ◼️पोलीस स्टेशन चिचगड, अंतर्गतश्रीराम विद्यालय चिचगड येथील विद्यार्थ्यांनी पो.स्टे.चिचगड येथे भेट दिली असता दि- 07/01/2023 रोजी पोलीस स्टेशनला पोलीस स्थापना दिवस सप्ताहच्या अनुषंगाने कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना पोलीस दल व त्याचे कामकाज तसेच पोलीस व जनता यांचे संबंध कसे असावे याबाबतीत विद्यार्थ्यांना ठाणेदार श्री. शरद पाटील यांनी मार्गदर्शन केले.

“पोलीस स्थापना दिवस सप्ताह” निमित्ताने जनमानसात पोलीस विभागाच्या प्रति सहानभूती निर्माण करण्यासाठी

1) विद्यार्थ्यांना ठाण्यातील विविध कामकाजाची माहिती देण्यात आली.2) हत्यार तसेच दारूगोळा यांची प्राथमिक माहिती 3) विविध IPC च्या कालमा नुसार दाखल होणार्‍या गुन्ह्याची माहिती 4) पोलीस स्टेशन व कोर्ट यांचे कामकाज कसे चालते याबद्दल सविस्तर माहिती 5) वाहतुकीचे नियमा बाबत माहिती 6)अंधश्रद्धा निर्मूलन,बाल लैगिक अत्याचार, ऑनलाईन फसवणूक, भ्रष्टाचार ,6)सायबर क्राईम बाबत माहिती,7)महिला व बालकांची सुरक्षितता संबंधात माहिती8)रस्ते अपघात व नियम जागरूकता6)नक्सल विरोधी जागरूकता आदि वरील सर्व मुद्यांची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली.

“पोलीस स्थापना दिवस सप्ताह” च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे (IPS) , अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प,(देवरी), श्री अशोक बनकर, “उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री. सुनील ताजने यांचे मार्गदर्शना खाली

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन सप्ताह निमीत्त्याने आयोजित कार्यक्रमा प्रसंगी पोलीस ठाणे चिचगड येथील पोलीस अधिकारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करून जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, व शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

Print Friendly, PDF & Email
Share