शहर प्रतिनिधी/सालेकसा
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सालेकसा तालुका पत्रकार संघ च्या वतीने अर्धनारेश्लवरालय हलबीटोला या ठिकाणी पत्रकार दिन व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अनुषंगाने तालुक्यातील 18 ते 25 वयोगटातील युवक-युवतींसाठी सकाळी ७:३० वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्‍पर्धेचे शुभारंभ सालेकसा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद बघेले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे. तसेच पत्रकार दिनानिमित्त होऊ घातलेल्या समाज प्रबोधन कार्यक्रमात सत्यपाल महाराज यांचे शिष्य उदयपाल यांच्या सप्तखंजिरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार संजय पुराम, अध्यक्ष म्हणून सहसराम कोरोटे आमदार आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास शिरसाट तहसीलदार सालेकसा, प्रमोद बघेले ठाणेदार सालेकसा, एस.टी. तुरकर गट विकास अधिकारी सालेकसा ,अभिजीत इलामकर वनक्षेत्र अधिकारी सालेकसा, अजिंक्य दुधाने तालुका कृषी अधिकारी, अमित खोडनकर तालुका वैद्यकीय अधिकारी, उमेद लाल जैतवार, बबलू कटरे ,वासुदेव चुटे, गुणवंत बिसेन, तुकाराम बोहरे ,ब्रजभूषण बैस, कुलतार सिंग भाटिया ,लताताई दोंनोडे, वंदना काळे , टिनाताई चुटे, गीता लिल्हारे, चंद्रकुमार बहेकार उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांना पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे सालेकसा तालुका पत्रकार संघातर्फे कळविण्यात येत आहे.

Share